राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ! केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता मिळणार .

Spread the love

महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी आली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 18 महीने कालावधील महागाई भत्ता मिळणार आहे . या 18 महीने कालावधी मधील महागाई भत्ता बाबत केंद्र सरकारकडुन वन टाईम सेटलमेंट करण्यात येणार आहे .

म्हणजेच एकाच वेळी महागाई भत्ता मध्ये अपेक्षित वाढ केली जाईल .अथवा या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम एकाच वेळी रोखीने अदा करण्यात येईल .कारण कामगार न्यायालयाच्या निर्णयानुसार , कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक बाबी गोठवता येत नाही .यामुळे कर्मचाऱ्यांना 18 महिने गोठविण्यात आलेला महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याच केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जाणार आहे . राज्य शासन सेवेतील केवळ या 18 महिने कालावधी मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच महागाई भत्ता लागु केला आहे . परंतु आता राज्यातील पात्र कर्मचारी / पेन्शधारक कर्मचाऱ्यांना या 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ताचा लाभ लवकरच मिळणार आहे .

  याबाबत केंद्र सरकारकडुन अधिकृत्त घोषणा केली जाणार आहे . केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखिल हा लाभ तात्काळ लागु करण्यात येणार आहे .

Leave a Comment