महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते खर्च भागविण्यासाठी आवश्यक मागणी नुसार निधीं वितरीत करण्यात आली आहे . याबाबतचा आज दि.08 मार्च 2022 रोजी राज्य शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित झाला आहे .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .
जिल्हा परिषदेमधील पाणी पुरवठा विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते खर्च भागविण्यासाठी रुपये 501.456 लाख इतका निधी वितरीत करण्यात आला आहे .सदर निधी जिल्हा परिषदेमध्ये नियमित आस्थापना /अनिवार्य या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेशित करण्यात आले आहेत .
सदर निधी खर्ची टाकताना निधीची उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावेत .व सदरचा खर्च वेतन व भत्ते यासाठीच खर्ची टाकण्यात यावा .अन्यथा निधी वितरणाची अनियमितता समजण्यात येईल .तसेच सदर निधी खर्च करताना वित्त विभागाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आदेशित या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे .
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे .


