महाराष्ट्र राज्य पोलिस शिपाई भरती सेवाप्रवेश नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे . याबाबत महाराष्ट्र पोलिस अधिनियमामध्ये बदल करण्यात आला आहे . याबाबतचा अधिकृत्त आदेश दि.02.03.2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निर्गमित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम 2011 नियम 8 च्या पोट नियम नंतर आणखीण एक पोट नियम समाविष्ट करण्यात आले आहेत . यामध्ये जे उमेदवार एन.सी.सी प्रमाणपत्र धारण केलेले आहेत अशा उमेदवारांना अतिरीक्त गुण दिले जाणार आहे . एनसीसी मध्ये प्रमाणपत्राच्या श्रेणीनुसार परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जाणार आहे .
प्रमाणपत्राच्या श्रेणीनुसार गुणदानाचा तक्ता खालीलप्रमाणे दर्शविला आहे .
अ.क्र | प्रमाणपत्र श्रेणी | अधिकचे गुण |
01 | NCC क प्रमाणपत्र | परीक्षेतील एकुण गुणांच्या पाच टक्के गुण |
02 | NCC ब प्रमाणपत्र | परीक्षेतील एकुण गुणांच्या तीन टक्के गुण |
03 | NCC अ प्रमाणपत्र | परीक्षेतील एकुण गुणांच्या दोन टक्के गुण |
वरील तक्त्यानुसार महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती प्रक्रिया ही 100 गुणांची असते . यामध्ये उमेदवारांना श्रेणीनुसार क,ब,अ अनुक्रमे 5,3,2 गुण अतिरिक्त /बोनस दिले जाणार आहे . यामुळे NCC प्रमाणपत्र धारक उमेदवारांना अतिरिक्त गुणांचा लाभ मिळणार आहे .
याबाबतचा सेवाप्रवेश आदेश खालीलप्रमाणे आहे .

I am intrested