कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघंटनेची वार्षिक बैठक नुकतेच पार पडली . या बैठकिमध्ये भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरामध्ये वाढ होण्याची कर्मचारी अपेक्षा करत होते . EPFO संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी यांची शनिवारी बैठक पार पडली .
या बैठकिमध्ये भविष्य निर्वाह निधी मधील ठेवींवरील रक्कमेवर व्याजदरामध्ये वाढ करण्याऐवजी कमी करण्यात आला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसुन येत आहे .सन 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये भ.नि.निधीवरील ठेवीवर 8.5 टक्के व्याजदर होते . तर या आर्थिक वर्षांमध्ये व्याजदरांमध्ये वाढ होण्याची आशा कर्मचाऱ्यांना होती . परंतु CBT कडुन सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता भ.नि.नि. ठेवीवरील रक्कमेवर 8.1 टक्के व्याजदर निश्चित केला आहे .
दर वर्षी मार्च महिन्यात व्याजदर निश्चित केले जाते . हे व्याजदर केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागु राहतात . कारण राज्य शासनाने याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन , केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो भ.नि.नि. ठेवीवरील जो व्याजदर लागु होईल . तोच राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आला आहे .