शासकिय कर्मचाऱ्यांना मादक पेय व मादक औषधांचे सेवन करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे . परंतु शासकिय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैयक्तिक आयुष्य जगत असताना यामध्ये काही अंशी सुट देण्यात आली आहे . कारण कर्मचाऱ्यास वैयक्तिक आयुष्यामध्ये सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची मुभा संविधान आहे .
यामुळे शासकिय कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळी कोणत्याही मादक पेय / मादक औषधे सेवन करण्यास पुर्णत : प्रतिबंध लावण्यात आला आहे . जेणेकरुन प्रशासनाची प्रतिमा नागरिकांच्या दृष्टीने नकारात्मक होणार नाही . व कर्तव्यपालनावर याचा विपरीत परिणाम होणार नाही . परंतु कर्मचाऱ्यास वैयक्तिक आयुष्यात काही अंशी सुट देण्यात आली आहे . याबाबत कोणता नियम आहे .ते खालीलप्रमाणे पाहुयात .
- सार्वजनिक ठिकाणी मादक पेय / मादक औषधांचे सेवन करण्याचे टाळावे .
- नशा चढलेल्या अवस्थेत गर्दीच्या / सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये .
- मादक पेयांचे /मादक औषधांचे प्रमाणाच्या बाहेर सेवन करु नये .
वरील नियमांचे शासकिय कर्मचाऱ्यांकडुन पालन करणे आवश्यक आहे . अन्यथा कर्मचारी दंडास प्राप्त ठरेल .