राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत ,  राज्य शासनाच्या हालचाली सुरु .

Spread the love

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागु केली जाणार आहे . कारण राजस्थान व छत्तीसगढ राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे . या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु केली जाणार आहे .यामध्ये प्रामुख्याने ज्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीसाठी कमी वर्षे  शिल्लक आहेत . अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे .

त्याचबरोबर जे कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना मध्येच सेवानिवृत्त झालेले आहेत . अशा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे . येत्या सप्टेंबर 2022 पर्यंत याबाबतची संपुर्ण प्रक्रिया पुर्ण केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे .राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या स्टेटमेंट मध्ये , पुढील दोन महीन्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे . याबाबत राज्य शासनाने हालहाली सुरु केल्या आहेत .

राज्य सरकारकडुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतच्या प्रशासकीय हालचाली –

कर्मचाऱ्यांच्या TIER -1 मध्ये जमा असणारी रक्कमेचा हिशोब राज्य शासनाने मागविले आहे . त्याचबरोबर  TIER -2 मध्ये कर्मचाऱ्यांची जमा असणारी रक्कम व्याजासह परत देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे . याबाबत राज्य शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित झाले आहे . याचाच अर्थ राज्य शासनाकडुन TIER -2 खाते बंद करणे आहे . TIER -2 बंद झाल्यानंतर TIER -1 मधील रक्कम कर्मचाऱ्यांचे पी.ए खात्यात वर्ग केले जाणार आहे .

Leave a Comment