राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकाबाबत अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आज दि.16.03.2022 रोजी निर्गमित झाला आहे .हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडुन निर्गमित झाला आहे . या शासन निर्णयानुसार , वेतन देयकांसोबत खर्च मंजुरी आदेश तसेच अनुदान वितरणासाठी शाईच्या स्वाक्षरीची प्रत जोडण्याबाबत सविस्तर सुचना देण्यात आल्या आहेत .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र कोषागार अधिनियमानुसार , बीम्स प्रणालीवर शाईच्या स्वाक्षरीची प्रत स्कॅन करुन अपलोड करणे अनिवार्य आहे . याशिवाय बिम्स प्रणालीवर अनुदान निधी वाटप करता येणार नाही .सहाय्यक अनुदानाच्या अनुदान वितरण करण्यासाठी शाईच्या स्वाक्षरी बीम्स प्रणालीवर तपासणीसाठी उपलब्ध करुण देण्यात आली आहे .
यामुळे अनुदान वितरण निधी वाटप या संबंधी स्वाक्षरी प्रत जोडण्याची आवश्यकता नाही . मात्र खर्चास मंजुरी देण्याबाबत , शाईच्या प्रती आहरण व संवितरण अधिकारी यांनी जोडणे आवश्यक आहे . या बाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे .

