नाेकरीची मोठी संधी – राज्यात 7231 पोलिस ,1000 तलाठी तर 1700 राज्यसेवेच्या जागेसाठी भरती बाबत संबंधित विभागांची मंजुरी .

Spread the love

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी 7231 पोलिस शिपाई जागेच्या भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे .याबाबत गृहमंत्री यांनी विधानसभंत बोलतना भरती प्रक्रिया विषयी माहिती दिली आहे .2019 मधील भरती प्रक्रिया पुर्ण झाली असुन , नेमणुका बाबत आदेश देणे बाकी असल्याचे मा.गृहमंत्री यांनी स्पष्ट केले आहे . त्याचबरोबर लवकरच 7231 जागांच्या भरती प्रक्रियेसाठी मंजुरी देण्यात आली आहे .

त्याचबरोबर राज्याचे महसूलमंत्री यांनीही 1000 तलाठ्यांच्या जागेसाठी भरती प्रक्रिया करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे .राज्यामध्ये तलाठ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत . यामळे प्रशासनावर याचा मोठा ताण पडत आहे . यामुळे मंत्रीमंडळाने तलाठ्यांच्या 3165 जागांसाठी भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे . परंत पहिल्या टप्यामध्ये , 1000 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

त्याचबरोबर एमपीएससी कडुन 1700 जागांसाठी भरती प्रक्रिया लवकच केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . तसेच ही भरती प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबविण्यात येणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे .यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाच्या संधी मिळणार आहेत .

Leave a Comment