राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ! थकबाकीची रक्कम व्याजासह मार्च अखेर अदा करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक .

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन थकबाकीच्या रकमेचे व्याजासह मार्च अखेर अदा करण्यात येणार आहे .याबाबत जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक कडुन दि.14.03.2022 रोजी एक परीपत्रक निर्गमित झाले आहे .या परिपत्रकानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांचे 6 व्या वेतन आयोग थकबाकीच्या रक्कमा व्याजासह देण्याबाबत कोषागार कार्यालयांना आदेशित करण्यात आले आहेत .

दि.01.01.2006 ते 31.03.2009 या कालावधीमधील राष्ट्रीय निवृत्तीवेतनाची रक्कमा एन.पी.एस मधील टायर – 2 मध्ये जमा करण्यात आले होते . अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदरच्या टायर – 2 मधील रक्कमा व्याजासह कर्मचाऱ्यांना 31 मार्च पर्यंत अदा करण्यात येणार आहे . सदर कर्मचाऱ्यांची बदली झाली असल्यास , संबंधित आहरण अधिकाऱ्यांकडुन पुर्वीच्या कार्यालयातुन माहीती पडताळणी करुन घेण्यात येणार आहे .

त्याचबरोबर सदरची कार्यवाही दि.28 मार्च 2022 पुर्वी करण्याचे आदेश कोषागार कार्यालयांना देण्यात आले आहेत . याबाबतची नियमावली व शासन निर्णय या परिपत्रकासोबत देण्यात आलेले आहेत . याबातचे सर्व शासन निर्णय व नियमावली वाचा सविस्तर खालीलप्रमाणे .

Leave a Comment