केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळी सणापुर्वी जानेवारी 2022 पासुन 3 टक्के महागाई भत्ता वाढविणे प्रस्तावित होते . याबाबत केंद्र सरकारनेही सकारात्मक भुमिका घेतली होती .जुलै 2021 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के दराने महागाई मिळत आहे .
जानेवारी 2022 मध्ये आणखीण 3 टक्के वाढ करण्याची कामगार युनियनची मागणी होती . व या मागणीच्या प्रस्तावर होळी सणापुर्वी निर्णय घेतला जाणार होता . याबाबत संसदेमध्ये प्रश्नोत्तर विचारले असता , केंद्रीय राज्य वित्त यांनी स्पष्ट केले कि , महागाई भत्ता तुर्तास वाढविला जाणार नाही . व बाजारभावाच्या महागाईनुसार डी.ए.वाढविला जाईल . यामुळे सध्या 31 टक्के दरानेच महागाई भत्ता लागु राहणार आहे .
त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना 31 टक्के दर प्रमाणे महागाई भत्ता साठी माहे एप्रिल 2022 पर्यंत वाट पहावी लागणार आहे . याबाबत राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल मध्ये वाढीव 3 टक्के DA व DA फरकाची रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत .