State govt. Employee 3% DA (GR):- राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता .

Spread the love

State govt. : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना DA वाढीबाबत , राज्य शासनाने महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के DA माहे एप्रिल महीन्याच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे . अशी खात्रीलायक  माहिती  सुत्राकडुन समजली आहे .

यामुळे केंद्र सरकारप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना , वाढीव 3 टक्के महागाई भत्ता लागु होण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे .शिवाय हा वाढीव महागाई भत्ता जुलै 2021 पासुन लागु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे . तसेच जुलै 2021 पासुनचा DA फरक देखिल देण्यात येणार आहे . प्रथम DA फरकाची रक्कम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे .व राज्य कर्मचाऱ्यांना DA फरकाची रक्कम देयकासाठी नंतर नव्याने आदेश निर्गमित केला जाणार आहे .

राज्य कर्मचाऱ्यांचा , केंद्राप्रमाणे 31 टक्के DA होणार –

माहे एप्रिल मध्ये 3 टक्के महागाई भत्ता वाढीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हो 31 टक्के होणार आहे . DA फरकाची रक्कम देखिल मिळणार असल्याने ,  कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .

याबाबतचा शासन निर्णय माहे मार्च अखेर निर्गमित केला जाण्याची शक्यता आहे .

Leave a Comment