BIG NEWS : मा.अजितदादा यांनी कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , घेतला  मोठा निर्णय .

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मोठी आनंदाची बातमी आली आहे . ती म्हणजे , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्यावतीने दि.17.03.2022 ते 18.03.2022 या कालावधीमध्ये भव्य अधिवेश पार पडले . हे अधिवेशन पनवेल जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आले होते .

या भव्य कर्मचारी  अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार , मा. खा. शदर पवार व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते . यावेळी मा. शदर पवार यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सांगितले कि , जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागु करण्यात येईल . याबाबत राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन  समितीची स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली .

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा .अजितदादा पवार यांनी सांगितले कि , छत्तीगड व राजस्थान राज्याप्रमाणे  लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल . राष्ट्रीय पेन्शन योजना मधील श्रुटी दुर करण्याचे काम सध्या सुरु आहे . व या योजनेतील रक्कम थेट जुन्या पेन्शन योजनेमध्ये कशी वर्ग करता येईल . याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मा. अजितदादांनी यावेळी दिली .

त्याचबरोबर राज्यातील काँग्रसचे ज्येष्ठ नेते मा.नाना पटोले यांनी ट् विट करुन सांगितले कि , राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच छत्तीसगढ व राजस्थान सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागु होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत .

Leave a Comment