” वन नेशन वन रेशन ”  योजना – देशात कोणत्याही रास्त दुकानात मिळणार राशन . 

Spread the love

    केंद्र सरकारकडुन वन नेशन व रेशन ही योजना लवकरच चालु करण्यात येणार आहे .यामुळे देशातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे . या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट्ये म्हणजे देशातील नागरिक कोणताही नागरिक , कोणत्याही राज्यात कामानिमित्त गेल्यास त्या ठिकाणी राशन मिळणार आहे .

यासाठी कोणत्याही प्रकारच्या राशन कार्डची आवश्यकता राहणार नाही . कारण देशामध्ये जवळपास 90 टक्के राशन कार्ड हे आधार कार्डशी कनेक्ट झाले आहेत . यामुळे नागरिकांना कोणत्याही रास्त दुकानावर आधार बोयोमेट्रिक करुन राशन उपलब्ध होणार आहे .देशातील नागरिकांना कामानिमित्त इतरत्र ठिकाणी जावे लागते . यामुळे अशा नागरिकांना हक्काचे राशन मिळत नाही .

म्हणुनच केंद्र सरकारडुन या योजनेची लवकरच सुरुवात केली जाणार आहे . यामुळे गरिब नागरिकांना मोठा फायदा होणार आहे .शिवाय राशन हे आधार बायोमेट्रिक पद्धतीने होणार असल्याने , कोणत्याही यामध्ये प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही .ही योजना केंद्र सरकारकडुन राबविली जाणार असल्याने , देशातील सर्वच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे .

Leave a Comment