बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा मागील 5 महीने पासुन विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप चालुच आहे . परंतु आता बस महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करण्याऐवजी संपुर्ण खाजगीकरण होताना दिसत आहे . अशा परिस्थिती मध्ये कर्मचाऱ्यांचा संप करणे कितपत योग्य आहे . अशी चर्चा होत असताना दिसत आहे .
कारण महामंडळाला संपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे .ह्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी यापुढे महामंडळाकडुन कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्याचे ठरविले आहे . यामुळे यापुढे महामंडळ संपुर्ण खाजगीकरण होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत .
त्याचबरोबर या संपामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत . यामळे अशा कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी पद्धतीने रिक्त जागेवर भरती करण्यात आली आहे . बस महामंडळ खुप दिवसापासुन बंद असल्याने , नागरिकांच्या प्रवाशाची होणारी गैरसोय लक्षात घेता , कंत्राटी चालकांमार्फत बस चालु करण्यात आल्या आहेत .
यापुढे बस महामंडळ संपुर्ण खाजगीकरण होण्याच्या स्पष्ट चिन्हे दिसुन येत आहेत .यामुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांनी संपाबाबत मवाळ भुमिका घेणे योग्य राहील . असे तज्ञांचे मत आहे .