सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्युज आली आहे . ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल 2022 पासुन महागाई भत्ता 31 टक्के दराने लागु करण्यात येणार आहे .केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना या अगोदरच 31 डी.ए करण्यात आला आहे . त्याच धर्तीवर अनेक राज्यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए. मध्ये वाढ करण्यात येत आहे .
कोराना महामारीमुळे सर्वच राज्यांनी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवला होता . त्यानंतर केंद्र सरकारने 01 जुलै 2021 पासुन महागाई भत्ता मध्ये 28 टक्के वाढ केली . व 18 महीने गोठविण्यात आलेल्या डी.ए बद्दल आणखीण 3 टक्के डी.ए. वाढविण्यात आला . त्याच धर्तीवर उत्तराखंड , मध्य प्रदेश , पंजाब , हरियाणा , तेलंगणा राज्य सरकारकडुन डी.ए. मध्ये वाढ करण्यात आली आहे .
मध्ये प्रदेश राज्य सरकारने माहे एप्रिल 2022 पासुन DA मध्ये 11 टक्के वाढ लागु केली आहे . या अगोदर या कर्मचाऱ्यांना 20 टक्के दराने DA मिळत होता .केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आणखीण 3 % DA वाढणार आहे . यामुळे DA हा 34 % होणार आहे .
महाराष्ट्र राज्य सरकार 3 % DA वाढ
महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा केंद्र सरकारच्या निर्णयानंतर लगेचच , राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 11 टक्के वाढ लागु करण्यात आली होती . त्याचबरोबर केंद्र सरकार प्रमाणे वाढीव 3 टक्के महागाई भत्ता माहे एप्रिल मध्ये लागु करण्यात येणार आहे . याबाबतच सविस्तर शासन निर्णय मार्च अखेर निघण्याची शक्यता आहे .