या आमदारांना मिळते 1 लाख पेक्षा अधिक पेन्शन तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कधी ?

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील माजी आमदारांच्या पेन्शनवर महिन्याला 6 कोटी 64 लाख रुपये एवढा निधी दर महिन्याला खर्च केला जातो . तर वार्षिक 79 कोटी 70 लाख रुपये निधी खर्च होतो . तर शासनाची संपुर्ण आयुष्य सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का लागु केली जात नाही .असा प्रश्न सर्वांना पडला आहे .

1 लाख रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या टॉप 10 माजी आमदारांची यादी

अ.क्रआमदारांचे नावेप्रतिमहा पेन्शन (रुपयामध्ये )
01.स्वरुपसिंग नाईक1 ,16,000/-
02.पद्मसिंग पाटील1,10,000/-
03.मधुकर पिचड1,10,000/-
04.जिवा पांडु गावित1,10,000/-
05.सुरेशदादा जैन1,08,000/-
06.रोहिदास पाटील1,08,000/-
07.रामदास कदम1,04,000/-
08.अनंतराव थोपटे1,02,000/-
09.विजयसिंग मोहिते1,02,000/-
10.दादा जाधवराव1,02,000/-

मासिक निवृत्तीवेतनधारण करणाऱ्या आमदारांची एकुण संख्या 794 आहे . तर विधान परिषदच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनासाठी एकुण 2 कोटी 9 लाख रुपये इतका खर्च होतो .

आमदारांच्या निवृत्तीवेतनावर एवढा खर्च होतो . तर जे कर्मचारी आयुष्यभर शासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु का करण्यात येत नाही . असा प्रश्न सर्वांना पडला आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे .

Leave a Comment