BREAKING NEWS : राज्य शासन सेवेतील नियमित कर्मचाऱ्यांना श्री. बक्षी समिती शिफारशीनुसार , जुलै 2021 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु .

Spread the love

राज्यातील शासकिय व इतर पात्र कर्मचाऱ्यांयना सातवा वेतन आयोगानुसार , वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा महत्वाचा शासन निर्णय दि .5 एप्रिल 2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झाला आहे . या शासन निर्णयान्वये , राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागु करण्यात आला आहे .

केंद्रीय सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीं विचारात घेवून , राज्यातील शासकिय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आले आहे .राज्यातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्री . बक्षी समितीच्या शिफारशीनुसार काही फेरफारासह सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आली आहे .तसेच ज्या उपक्रमातील कर्मचारी राज्य शासनाने निश्चित केलेले निकष पुर्ण करतील अशा कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहे .महाराष्ट्र राज्य व इतर मागासवर्गी य वित्त आणि विकास महामंडळाने राज्य शासनाने निश्चित केलेले निकष पूर्ण केले आहे .

यामुळे या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी जुलै 2021 पासुन लागु करण्यात येत आहे .यामुळे राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमामधील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे .

याबाबतचा सविस्तर शासन  डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment