सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता बाबत , महत्वाची बातमी आली आहे .सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2021 पासून 28 % दराने DA लागू करण्यात आला आहे .त्याचबरोबर या कालावधी मधील महागाई भत्ता फरक देखील रोखीने मार्च महिन्याच्या वेतनसोबत अदा करण्यात येणार आहे .
महागाई भत्ता हा बाजारभावाच्या निर्देशांकानुसार ,ठरतो .तसेच AICPI निर्देशांक मधील वाढ देखील मंदावली जाणार आहे .जानेवारी 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 34 % करण्यात आला आहे .राज्य कर्मचाऱ्यांचा देखील DA जानेवारी 2022 पासून 34 % करणे प्रस्तावित आहे .बाजार भाव /AICPI निर्देशांक जुलै 2022 पर्यंत स्थिर राहील .यामुळे महागाई भत्ता मध्ये वाढ होणार नाही .जर AICPI निर्देशांक मध्ये वाढ झाली तर , DA मध्ये वाढ होईल .
कोरोना महामारीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती .परंतु सध्या भारतीय अर्थव्यवस्था चांगली झाली आहे .त्याचबरोबर रशिया – युक्रेन युद्धामुळे महागाई वर विपरीत परिणाम होत आहे .शिवाय पैशाची किंमत कमी होत असे असल्याने ,अर्थशास्त्राच्या नियमानुसार बाजारामध्ये पैशाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे .म्हणूनच जुलै 2022 मध्ये महागाई भत्ता मध्ये वाढ केली जाणार नाही .