आनंदाची बातमी ! अखेर राज्यातील या कर्मचाऱ्यांना 34 % दराने महागाई भत्ता लागू .GR निर्गमित .

Spread the love

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ,जानेवारी 2022 पासून 34 % करण्यात आला आहे .याच धर्तीवर महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे वाढीव 3% महागाई भत्ता लागू करणेबाबतचा शासन परिपत्रक निर्गमित झाला आहे .

राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 01 जानेवारी 2022 पासून 3 % महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे .यामुळे महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना ,एकूण 34 % दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे .शिवाय जानेवारी 2022 पासूनची DA थकबाकी सुद्धा रोखीने देण्यात येणार आहे .अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ,DA वाढ लागू करण्यात येते .

राज्य कर्मचाऱ्यांना 3 % DA वाढ कधी ?

राज्यातील सरकारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासून 31 % दराने DA वाढ लागू करण्यात आली आहे .केंद्र सरकार प्रमाणे , आणखीन 3 % DA वाढ लवकरच मिळणार आहे . 3% DA वाढीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण DA केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 34 % होणार आहे .

34 % DA बाबतचे शासन परिपत्रक

Leave a Comment