State Employee : राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत करण्याबाबत , मा.अजित दादा पवार यांनी विभागांना दिले निर्देश .

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत वेळेत होत नसल्याचे निर्देशास आले असता , याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री वर्षाताई यांची कॅबिनेट बैठक पार पडली आहे .कर्मचाऱ्यांचे वेतन विहित वेळेत होण्याकरीता विविध निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत .

राज्यातील जिल्हा परिषदा तसेच शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर खासगी प्राथमिक ,माध्यमिक , व उच्च माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते . अनेकवेळा प्रणालीसह इतर यंत्रणेतील त्रुटींमुळे वेतन आहरण करण्यास विलंब होतो . हा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाला वित्त विभागाकडुन समन्वयाने काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजिदादा यांनी दिले आहे .

त्याचबरोबर तांत्रिक सुधारणा करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्याकरीता वित्त विभागाचे सहकार्य मिळणार आहे . व वेतन विहित वेळेत अदा करण्यात येणार आहे .याबाबतची माहिती मा.अजितदादांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे .

Leave a Comment