ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दणका , न्यायालयाच्या आदेशाचे होणार पालन .

Spread the love

मागील पाच महिन्यापासुन बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप चालु होता . कर्मचाऱ्यांचा संपविण्यामध्ये , राज्य सरकारला यश आले तरीही , अनेक कर्मचारी संपावरच तटस्थ आहेत . परंतु महामंडळाने आदेश काढुन कर्मचाऱ्यांना कामावर रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत .तसे नाही केल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीचे आदेश देण्यात येणार आहे .

कर्मचाऱ्यांचा मागील पाच महिने संप होता . या कालावधीमधील , पगार देण्याबाबत कर्मचाऱ्यांकडुन मागणी करण्यात येत आहे . परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार काम बंद वेतन बंद या निर्णयाची अंमलबजावणी राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे . यामुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांनाचा सामना करावा लागणार आहे .या कालावधीमध्ये जे कर्मचारी कामावर हजर होते . त्याच कर्मचाऱ्यांना पगार मिळणार आहे .संपावर तटस्थ होते , अशा कर्मचाऱ्यांना संप कालावधी मधील कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही .

संपामुळे बस महामंडळाचे मोठे नुकसान

संपामुळे महामंडळाचे जवळपास 3500 बसेस नादुरुस्त झालेल्या आहेत . या नादुरुस्त बसेसला दुरुस्त करण्यासाठी सुमारे 1.30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे . यामुळे बस महामंडळ मोठ्या संकटात सापडले आहे .

Leave a Comment