BREAKING NEWS: महाराष्ट्रामध्ये , भाजपा व मनसे युती होणार .

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये , मोठा बदल होण्याची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहेत . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये , भारतीय जनता पार्टी सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना येण्याची शक्यता वर्तविली जात आहे .

सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शह देण्यासाठी ही युती करण्याची चर्चा होत आहे . कारण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये , सर्वात जास्त सदस्य निवडुन आलेल्या भाजपाला सत्ता स्थापन करता आले नाही . यामुळे भाजपाला कोणत्यातरी पक्षाची आवश्यकता असल्याने , मनसेसोबत युती करण्याची मोठी शक्यता आहे .शिवाय सध्या मनसेची असणारी हिंदुत्ववादी विचारसरणी ही भाजपा पक्षाला अनुकुल वाटत असल्याने , युतीची चिन्हे स्पष्ट दिसुन येत आहेत .

मनसे पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका मध्ये मोठे महत्व आहे . कारण ठाणे ,मुंबई , पुणे , नागपुर अशा महानगरामध्ये मनसेला मोठा पाठिंबा मिळत आहे . यामुळे भाजपा मनसे सोबत युती करेल , अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे .सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवा ,अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू अशी भुमिका घेतल्याने ,ही भुमिका शिवसेना पक्षाला शह देणारी अनेकांना वाटत आहे .

Leave a Comment