राज्य शासन सेवेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ लागु करण्यात आला आहे . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय दि .19.04.2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झाला आहे .सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .
राज्यातील अशासकिय कला संस्था मध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालील सेवाविषयक लाभ अनुज्ञेय करण्यात आलेले आहेत . यामध्ये अर्जित रजेचे रोखीकरण दि.10 .11.2009 अन्वये अर्जित रजेचे रोखीकरण सुधारीत वेतन श्रेणीनुसार करण्यात मंजुरी देण्यात आली आहे .त्याचबरोबर महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 180 दिवस प्रसूती रजेची मर्यादा लागु करण्यात आलेली आहे. हा लाभ या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागु राहील .
त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना कॅन्सर / पक्षाघात झाले असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी नागरी सेवा नियम 1981 मधील रजेविषयक तरतुदीचा लाभ 19.04.2022 पासुन लागु करण्यात येत आहे . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा