केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण एकदा वाढ करण्यात आली आहे . नुकतेच केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार, वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 3 टक्के DA वाढ लागु करण्यात आली आहे .
केंद्र सरकारच्या अधिनस्त पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यात आली आहे . पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 13 टक्के वाढवून 381 टक्के तर 6 व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई वाढवून 203 टक्के करण्यात येणार आहे .
त्याचबरोबर पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुधारित घरभाडे भत्ता व वाहनभत्ता लागु करण्यात येणार आहे .यामुळे या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .
केंद्र सरकारच्या अधिनस्त असणाऱ्या महामंडळ , उद्याग समुह , परिमंडळ अशा विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन आहारित करण्यात येते .