सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने पेन्शन नियमात बदल करुन मोठी भेट कर्मचाऱ्यांनी देण्यात आली आहे .पेन्शन नियमात मोठा बदल करण्यात आल आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुबांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकार अंतर्गत पती – पत्नी दोघेही सरकारी नौकरीवर कार्यरत असल्यास , अशा कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर कुटुंबातील मुलांना पेन्शन स्वरुपात जवळपास 1.25 लाख रुपये महिना मिळणार आहे . अशी तरतुद करण्यात आली आहे . केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन / पेन्शन 1972 अंतर्गत बदल करुन हा निर्णय घेण्यात आला आहे .या नियमानुसार नौकरीमध्ये कार्यरत पती – पत्नीपैकी एकाचा मुत्यु झाल्यास ,पती / पत्नीला कौटंबिक पेन्शन मिळेल .त्याचबरोबर जर दोघांचाही मृत्यु झाल्यास , त्यांच्या मुलांना / नॉमिनीला कौटंबिक पेन्शन मिळेल .
नेमका कोणता बदल करण्यात आला आहे .
यापुर्वी एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास , त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन स्वरुपात कमाल 45000/- रुपये पर्यंत उपलब्ध करण्यात आले होते . परंतु या नियमात बदल केल्याने , पती / पत्नी सेवेत असल्यास , कुटुंबियांना एका पेन्शनच्या 50 टक्के व दुसऱ्या पेन्शची 30 टक्के रक्कम म्हणजेचे 75000/- रुपये कौटंबित पेन्शन देण्यात येईल .