धक्कादायक बातमी ! वयाच्या 50/55 वर्षापलीकडे /30 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या अनफिट कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती !GR निर्गमित .

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत 50/55 वर्षापलीकडील / 30 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या अनफिट कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याची कार्य पद्धती सा.प्र.वि यांच्या दि.10.06.2019 अन्वये कार्यवाही करण्यात येणार आहे . याबातचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि .22.04.2022 राज्य शासनाकडुन निर्गमित झालेला आहे .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .

ज्या कर्मचाऱ्यांचे वय 50/55 वर्षापलीकडे आहे /30 वर्षे सेवा पुर्ण झाली आहे . व जे कर्मचारी अनफिट आहेत , या कर्मचाऱ्यांमुळे शासकिय कामकाजावर विपरित होणे नाकारता येत नाही. अशा कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्त देण्याची कार्यवाही सा.प्र.वि यांच्या दि.10.06.2019 अन्वये करण्यात येणार आहे .शासकिय कामकाजावर विपरित परिणाम होवू नये , शिवाय कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ रहावे .यासाठी 40 ते 50 या वयोगटामधील कर्मचाऱ्यांची दोन वर्षातुन एकदा तर 51 वर्षावरील कर्मचाऱ्यांची वर्षातुन एकदा वैद्यकिय तपासणी प्रत्येकी 5000/- रुपये खर्चास मान्यता देत आहे .

वैद्यकिय तपासणीसाठी एक दिवसाचा कर्तव्यकाळ म्हणुन सुट्टी मिळेल .कर्मचाऱ्यांचा या वैद्यकिय बाबीवरचा खर्च हा कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेवरील वेतन व भत्ते या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .

शासन निर्णय

Leave a Comment