राज्य कर्मऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता व सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता कधी मिळणार ?

Spread the love

राज्यातील शासकीय , निमशासकीय , जिल्हा परिषदा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 34 टक्के दराने महागाई भत्ता लवकरच अदा करण्यात येणार असुन , याबाबत राज्य शासन दरबारी वित्त विभागाची प्रक्रिया सुरु झाली आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता डी. ए . फरकासह लागु करण्यात येणार आहे . त्याचबरोबर जानेवारी 2022 पासुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखिल या वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे . याबाबत राज्य शासनाकडुन लवकरच निर्णय घेतला जाणार आहे .कर्मचाऱ्यांची निराशा लक्ष्यात घेता राज्य शासनाकडुन माहे जुलै अगोदरच राज्य कर्मचाऱ्यांना / निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात येईल .

सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता जवळपास अनेक कर्मचाऱ्यांना मिळाला असला तरी अद्याप काही विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला व दुसरा हप्ता प्राप्त झालेला नाही . तिसरा हप्ता अदा करणेसाठी माहे सप्टेंबर 2022 पर्यंत स्थगिती राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन देण्यात आली आहे .म्हणजेच 7 वा वेतन आयोग फरकाचा तिसरा हप्ता हा माहे सप्टेंबर 2022 नंतर अदा करण्यात येईल .

Leave a Comment