सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ,महागाई भत्ता मध्ये आणखीण 3 % वाढ झाली निश्चित !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखीण एक आनंदाची बातमी आली आहे .ती म्हणजे महागाई भत्ता मध्ये आणखीन 3 % वाढ निश्चित करण्यात आली आहे .महागाई भत्ता हा बाजारभावाच्या किमतीवर निश्चित करण्यात येते .

बाजारभावाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने ,AICPI निर्देशांक मध्ये 1 अंकाची वाढ झाल्याने AICPI निर्देशांक 125 वरून 126 झाला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये आणखीण 3 % वाढ अपेक्षित आहे .ही वाढ जुलै ते डिसेंबर या कालावधी मध्ये लागू करण्यात येईल .सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 % दराने ,राज्य कर्मचाऱ्यांना 31 % दराने DA मिळत आहे .यामध्ये आणखीण 3% वाढ निश्चित झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 37% दराने DA मिळणार आहे .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 31% दराने जरी DA मिळत असला , तरी केंद्र सरकार प्रमाणे जानेवारी 2022 पासून 34 % DA लागू करणे प्रस्तावित आहे .ही वाढ निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना देखील लागू राहील .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .

Leave a Comment