भारतीय डाकसेवा मध्ये ,ग्रामीण डाकसेवक पदांचे 38926 जागांसाठी महाभरती !

Spread the love

भारतीय ग्रामीण डाकसेवा मध्ये , डाकसेवक पदांसाठी महाभरती राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .भारतामधील सर्व राज्यातील डाकविभागामध्ये , 38926 जागांसाठी भरती प्रक्रिया केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येत आहे .यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर ,सहाय्यक ब्रांच पोस्टमास्टर , डाकसेवक ,मेलगार्ड अशा पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

या सर्व पदांसाठी केवळ 10 वि शैक्षणिक पात्रता असून या पदासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून ,केवळ 10 वीच्या टक्केवारी वर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे .अर्ज सादर करण्याची सुरुवात 02 मे 2022 असून , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 05 जून 2022 आहे .सदर पदासाठी 100 रुपये आवेदन शुल्क असून राखीव प्रवर्गासाठी कोणतीही आवेदन शुल्क नाही .सदर पदे हे केंद्र सरकारचे बाह्य कर्मचारी असून , या पदांना कामाच्या तासानुसार वेतनमान दिले जाते .

कामाच्या तासानुसार 12000/- रुपये ते 14500/- रुपये वेतनमान दिले जाते .निवड प्रक्रिया 10 वीच्या टक्केवारी नुसार ,केली जाणार आहे .याबाबतची सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.

जाहिरात पाहा

हे पण वाचा –

ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो .

2 thoughts on “भारतीय डाकसेवा मध्ये ,ग्रामीण डाकसेवक पदांचे 38926 जागांसाठी महाभरती !”

Leave a Comment