घरगुती वीज ग्राहकांना मोठा फटका MSEDCL कडुन बसला आहे . तो म्हणजे अतिरिक्त सुरक्षा ठेव नावाखाली 650/- रुपयांची रक्कम वसुली केली जात आहे . 650/- रुपयांचे अतिरिक्त ठेव रक्कमांचे बिल राज्यातील सर्व घरगुती विज धारकांना आला आहे . यामुळे राज्यातील गरीब , मध्यमवर्गीय नागरिकांना हे बिल परवडणारे नसल्याने , अतिरिक्त सुरक्षा रक्कमांची बिल रद्द करण्यात यावे .अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात येत आहे .
MSEDCL कडुन जेंव्हा आपण मिटर घेतो , तेंव्हा आपल्याकडुन डिपॉझिट नावाखाली 500/- रुपये ते 2000/- रुपयापर्यंतचे बिल ग्राहकाला दिले जाते . असे असताना देखिल स्थिर भारांक देखिल ग्राहकांकडुन स्विकाराला जात असतो . असे असताना ग्राहकांकडुन अतिरिक्त सुरक्षा ठेव नावाखाली 650/- रुपये वसुल करणे योग्य नसल्याचे नागरिकांकडुन म्हटले जात आहे . यामुळे सदर सुरक्षा ठेव रक्कमाचे बिल रद्द करावे .अशी मागणी आता नागरिकांकडुन होत असल्याने याबाबत राज्य शासन देखिल योग्य ती कार्यवाही करण्याची शक्यता आहे .
माहे एप्रिल महिन्याच्या घरगुती विज बिलासोबत , अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल आल्याने सर्वसामान्य नागरिकांना एकाच महिन्यामध्ये विज बिल व 650/- रुपये अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम परवडणारी नाही . या अगोदर MSEDCL कडुन अशा प्रकारची कोणतीही रक्कम वसुल केली जात नव्हती .