आपण जर शासकिय कर्मचारी असाल तर , राजकारणांशी संबंध बाबत हा नियम माहिती असणे आवश्यक ! अन्यथा होवू शकतो गुन्हा .

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार विविध नियम लागु करण्यात आलेले आहेत . जर कर्मचाऱ्यांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास , कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होवू शकतो . कर्मचारी वर्तणूक नियमानुसार कर्मचारी राजकारणांशी संबंध बाबत विविध नियम घालुन देण्यात आलेले आहेत . याबाबचा सविस्तर नियम खालीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणुक ) नियम 1979 नुसार कोणत्याही शासकिय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकिय पक्षाचा / राजकारणांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाग घेणाऱ्या संघटनांचे सदस्य होता येणार नाही .त्याचबरोबर अशा राजकिय संघटनांना आर्थिक /इतर मार्गाची मदत करता येणार नाही .त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातीमधील व्यक्ती एखाद्या चळवळीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्य करत असेल , व अशा चळवळीपासुन भारतामधील कोणत्याही शासनाला घातक ठरत असल्यास आपल्या कुटुंबातील व्यक्ती अशा चळवळीस सहाय्य करण्यापासून परावृत्त करणे हे कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे . जर कर्मचारी परावृत्त करण्यासाठी असमर्थ ठरत असल्यास , कर्मचाऱ्यांना शासनास कळवले पाहीजे .

कर्मचारी कोणत्याही निवडणुकांमध्ये प्रचार करु शकत नाही , परंतु मतदान करण्यास कोणतेही निर्बंध नाही . पण कोणाला मतदान केले हे जाहीर करु / इतरांना सांगु शकणार नाही .त्याचबरोर कर्मचारी आपल्या शरीरावर , वाहनावर , घरावर कोणतेही निवडणुक चिन्ह लावणे म्हणजे तो कर्मचारी निवडणुकांमध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी झाल्याचे ग्राह्य धरले जाईल .म्हणुन असे कोणतेही निवडणुक चिन्हे लावू नये .

Leave a Comment