सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे .ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 4 टक्के वाढ होणार आहे . ही वाढ माहे जुलै 2022 मध्ये लागु करण्यात येणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या स्थुल वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .
केंद्र सरकारने माहे जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता मध्ये 03 टक्केने वाढ लागु केल्यानंतर माहे फेब्रुवारी मध्ये AICPI निर्देशांकामध्ये घट झाली होती . यामुळे जुलै 2022 मध्ये DA वाढण्याची शक्यता कमी होती .परंतु माहे मार्च महिन्याचा AICPI निर्देशांकामध्ये पुन्हा एका अंकांची वाढ झाल्याने AICPI निर्देशांक 126 अंकावर जावुन पोहोचला आहे .यावरुन महागाई भत्ता हा 38 टक्के असणे अपेक्षित आहे . म्हणुन जुलै 2022 मध्ये पुन्हा महागाई भत्ता वाढु शकतो .
महागाई भत्ता आणखीण 4 टक्के वाढु शकतो
माहे मार्च महिन्याचा AICPI निर्देशांक विचारात घेता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा आणखीण 4 टक्क्यांनी वाढु शकतो . याबाबतचा अधिकृत्त निर्णय जुन महीन्याच्या आकडेवारी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय वित्त विभागाकडुन अंतिम निर्णय घेतला जाईल .
राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढ कधी लागु होणार
राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना जुलै 2021 पासुन 31 टक्के दराने DA लागु करण्यात आला आहे , परंतु केंद्र सरकारप्रमाणे जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणे प्रस्तावित आहे .यामुळे केंद्र सरकारप्रमाणे DA वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्यात येते .