GR : राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणेसंर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.05.2022

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते अदा करणेसंदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.05.2022 रोजी निर्गमित झाला आहे . राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासनाने एक शासन निर्णय काढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते अदा करणेबाबत , राज्यातील मध्यवर्ती बँकांना परवानगी देण्यात आली होती . सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन खाते हे सरकारी बँकेतच असण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे . राष्ट्रीयकृत्त असणारी कोणत्याही बँकेमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन खाते उघडण्याची मुभा देण्यात आली आहे . शिवाय महाराष्ट्र राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती बँकांना देखिल कर्मचाऱ्यांचे वेतन , भत्ते व पेन्शन अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे .या शासन निर्णयानुसार बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर भत्ते प्रदान करणेसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत करणेबाबत मान्यता देण्यात येत अहे .

मुंबईतील ज्या शैक्षणिक संस्थांची बँक खाते राष्ट्रीयकृत्त बँकेत नाही अशा संस्थांना कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध असणाऱ्या बँकेमध्ये वेतन खाते उघडण्याचे आवाहन राज्य शासनाकडुन करण्यात आले आहेत .याबाबतचा सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment