राज्य शासकिय व पेन्शनधारक कर्मचाऱ्यंना कंद्र सरकारच्या धर्तीवर 34 % दराने महागाई भत्ता लागु करणेबाबतचा मार्ग सरकारकडुन मोकळा झाला आहे .राज्यातील शासकिय /पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणेच , जोनवारी 2022 पासुनच DA 34% दराने लागु करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन पुर्ण करण्यात आली आहे .
सातवा वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणेच DA व इतर भत्ते लागु करण्यात येतात .केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै 20221 पासुन 31 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात आला असुन , त्यामध्ये आणखीण 3 टक्के वाढ जानेवारी 2022 मध्ये करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 34 टक्के झाला आहे . याच धर्तीवर राज्यातील शासकिय / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 34 टक्के महागाई भत्ता लागु करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन पुर्ण करण्यात आली आहे .हा वाढीव DA जानेवारी 2022 पासुन DA फरकासह अदा करण्यात येईल .
राज्य कर्मचाऱ्यांना DA वाढीबाबतची अधिकृत्त निर्णय जुलै महिण्याच्या अगोदरच होण्याची शक्यता आहे .महागाई भत्ता वाढीबाबत व जुनी पेन्शन योजना बाबत राज्य शासनाची कॅबिनेट बैठक जुन महीन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे .