BREAKING NEWS : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय ,  शेतकऱ्यांचे कर्ज होणार सरसकट माफ .

Spread the love

मागील दोन वर्षामध्ये कोराना महामारीचे सावट मोठ्या प्रमाणात होते . त्याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे . कृषी उत्पन्नावर देखिल वाईट परिणाम झाला असल्याने , शेतकरी वर्गांना आर्थिक संकटातुन दुर करण्यासाठी राज्य सरकारकडुन कर्ज माफ करण्यात येणार आहे .

मराठवाडा , विदर्भ मधील शेतकरी वर्गांचे कर्जांची रक्कम कमी असली तरी मराठवाडा व विदर्भामध्ये पीकांचे उत्पन्न हे अत्यल्प प्रमाणात होत असल्याने शेतकरी वर्ग कर्जाच्या विळख्यात आडकला असल्याने , महाविकास आघाडी सरकारकडुन लवकरच शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी करण्यात येणार आहे . यामुळे शेतकरी वर्गांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .पश्चिम महाराष्ट्र मध्ये बागायती पिकांचे प्रमाण जास्त असल्याने , पश्चिम महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना कर्ज स्वरुपात जास्त रक्कम दिली जाते .त्या तुलनेत मराठवाडा व विदर्भ मध्ये केवळ कोरडवाहु शेती केली जाते . यामुळे कर्जाची रक्कम हि कमी असते .

शेतकऱ्यांना मिळणार दुहेरी फायदा !

महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनासाठी राज्याचा वाटा संबंधित विमा कंपनीना निधीचे वितरण करण्यात आले आहे . यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम माहे मे महिन्याच्या अखेरपर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे .

Leave a Comment