Spread the love

राज्य शासन सेवेतील शासकीय , निवृत्तीवेतन , व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे .कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर राज्य शासनाची महत्वपुर्ण बैठक संपन्न झालेली आहे .  सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची राज्य शासनाच्या मुख्यसचिव श्री.मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली .

सदर बैठकीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्यात आली .यामध्ये प्रामुख्याने दि.01.11.2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली .त्याचबरोबर मुख्यसचिव यांनी मा.बक्षी समिती खंड – 2 अहवाल विनाविलंब मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सादर करण्याचे आदेश वित्त विभागास देण्यात आले .तसेच सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार व अन्य 25 राज्यांप्रमाणे 60 वर्षे करणेबाबत सकारात्मक आश्वासन मा.मुख्यसचिव यांनी दिले .तसेच सदर बैठकीमध्ये विविध खात्यांमधील रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ भरणे बाबत चर्चा करण्यात आली .

त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये , केंद्र सरकारप्रमाणे वाहतुक भत्ता देण्याची मागणी सदर बैठकीमध्ये करण्यात आली .त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 34 टक्के दराने डी.ए , डी.ए फरकासह लागु करणेबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली .

4 thoughts on “राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ! डी.ए वाढ , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , जुनी पेन्शन इ. मागणींवर राज्य शासनाची बैठक संपन्न .”
  1. सेवानिवृत्ती चे वय वाढविण्याचा जिआर पण लवकरच निघावा अशी विनंती व हा निर्णय सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुध्दा असावा ही विनंती

  2. 30 वर्षे सेवा किंवा 60 व्या वर्षी सेवानिवृत्ती असावी. मात्र सर्वांना जुनीच पेंशन योजना लागू करावी.

  3. 60 वर्षे सेवानिवृत्त चे वय 1 जुलै 2022 पासूनच लागू होणे याचा गामभिर्याने विचार केला जावा कारण आजच्या दिनांक 24/07/2022 च्या बैठकीत शासनाने त्यास मंजुरी देण्यात आली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अटी शिवाय सरसकट 60 वर्षे पर्यंत सेवा करावी

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी