MSF : महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये तब्बल 7000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये 7000 जागांसाठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आलेले होते .सदर भरती प्रक्रियेबाबत माहे मार्च –एप्रिल 2020 दरम्यान मुंबई व नागपुर अशा दोन ठिकाणी भरती प्रक्रियेचे राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते . सदर भरती प्रक्रिया सुरक्षा रक्षक जाहीरात 2020 दि.25.02.2022 च्या संदर्भिय जाहीरातीचे भरती प्रक्रिया राबविणेबाबत सुधारित प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे .

वरील संदर्भामध्ये नमुद जाहीरातीनुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलामध्ये तब्बल 7000 जवानांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होते .सदर भरती राबविण्यासाठी राज्यतील 9 राज्य राखीव पोलिस बल गटाचे मैदानांमध्ये भरती मेळावा आयोजित करण्यात आले आहे .भरती प्रक्रियेमध्ये या अगोदर ज्या उमेदवारांने अर्ज दाखल केले होते . अशा उमेदवारांना सदर भरती प्रक्रीयेमध्ये भाग घेता येणार आहे .यासाठी उमेदवाराची पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .

याबाबत जाहीरातीचे शुद्धीपत्रक जाहीर झालेले असुन उमेदवारांच्या पत्यानुसार जिल्हे व भरती मेळावाचे ठिकाण सदर जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .आपल्या जिल्ह्यानुसार भरतीचे ठिकाण पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .

जाहिरात पाहा

Leave a Comment