Spread the love

• सर्वांना नमस्कार, आपल्या भारत देशामध्ये वैज्ञानिक व तंत्रज्ञानिक शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या ही वाढावी, तसेच मुलींना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये पर्यंतचे शिष्यवृत्ती देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थिनींना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्याकडून महाराष्ट्रातील पात्र सर्व मुलींना व इतर राज्यातील मुलींना सुद्धा गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

• ए आय सी टी इ यांनी याबाबतची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे. डिप्लोमा मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी म्हणजेच डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी थेट दहावीतून प्रथम वर्ष ॲडमिशन घेणाऱ्या किंवा 12 नंतर द्वितीय वर्षाला ऍडमिशन घेणार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणवत्ता वर आधारित राहणार किंवा ऍडमिशन वेळी पात्र गुणांवर आधारित राहणार. देशांमधील व राज्यांमधील जवळजवळ पाच हजार विद्यार्थींना यश शिष्यवृत्तीचा लाभ भेटणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी पोर्टल वर जाऊन स्कॉलरशिप साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

• या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी असावी. अर्ज दाखल केल्यानंतर त्वरित इन्स्टिट्यूट अर्जाची पडताळणी करा, त्यानंतर लगेच तंत्रशिक्षण संचालयाकडून डी टी ई अर्जाची पडताळणी करावी. शिष्यवृत्ती मिळण्याबाबतची कार्यवाही सुद्धा आपल्याला करता येणार आहे. भारत देशामध्ये जवळपास 5000 विद्यार्थिनींना यासोबत महाराष्ट्र राज्यामध्ये असे 624 विद्यार्थी यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. यासोबतच ईशान्येकडील जी राज्य आहेत व केंद्रशासित प्रदेश आहेत तेथील सर्व पात्र विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाईल.

2 thoughts on “प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा होणार पन्नास हजार रुपये, मुख्यमंत्र्यांकडून एक मोठी घोषणा !”

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी