Spread the love

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदा मध्ये सन 2019 मध्ये आरोग्य विभागाच्या 10,127 जागांसाठी मेगाभरतीची जाहीरात आली होती . सदर पदभरती प्रक्रिया कोरोना महामारीमुळे रखडली होती . सदर 10,127 जागांसाठी परत भरती प्रक्रिया राबविणे बाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडुन दि.26.08.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . याबाबतचा ग्राम विकास विभागाचा दि.26.08.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

आरोग्य विभागातील आरोग्य सेवक , आरोग्य सेवकिा , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , औषध निर्माता , आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदांकरीता तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला आहे .भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य शासनाकडुन वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे . या वेळापत्राकानुसार सदर भरती प्रकिया दि.27 ऑगस्ट 2022 पासुन सुरु करण्यात येणार आहे . सदन शासन निर्णयाच्या निर्णयानुसार ऑनलाईन परिक्षेचा दिनांक – 15 ऑक्टोबर , 16 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे . यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी सकाळी 11.00 ते 01.00 या वेळेत तर औषध निर्माता पदाकरीता दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत तर आरोग्य सेवक , आरोग्य सेवकिा या पदांकरीता 11.00 ते 01.00 या वेळमध्ये तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाकरीता दुपारी 3.00 ते 05.00 या वेळेमध्ये परिक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे .

सदर परिक्षेचा निकाल लगेचच जाहीर करण्यात येणार आहे . सदर लेखी परीक्षेचा निकाल 17 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधी मध्ये सदर महाभरती मधील सर्व पदांचा निकाल जाहीर करुन सदर रिक्त पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत . या महाभरती बाबतचा दि.26.08.2022 रोजीचा ग्रामविकास विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लि करा .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी