Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये , 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतन दिले जाते . परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक पदांच्या वेतनश्रेणीमध्ये कमी पगार येत असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारला सादर करण्यात आल्या आहेत . सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी मध्ये बदल करावा किंवा आठवा वेतन आयोग लागु करावा यासाठी कामगार युनियन कडुन केंद्र सरकारकडे मागणी केली आहे .

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मुळ वेतन हे 18000/- मिळते . तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मुळ वेतन हे 15000/- रुपये मिळते . सध्याच्या महागाईचा विचार करता तसेच दर 5-8 वर्षानंतर नवा वेतन आयोग लागु करण्याची तरतुद करल्याने , सन 2024-25 मध्ये नवा वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे . कामगार युनियन कडुन फिटमेंट फॅक्टर मध्य 3.68 पट वाढ करण्याची मागणी होत आहे . यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 18000/- वरुन 26000/- रुपेय होणार आहे .याबाबत कामगार युनियन कडुन केंद्र सरकारला नवा वेतन आयोग तसेच 18 महिने कालावधी मधील डी.ए थकबाकी मिळणेबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे .

नवा वेतन आयोग ऐवजी नविन वेतनप्रणाली अमंलात येणार ?

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागु न करता सातवा वेतन आयोगामध्येच नविन वेतन प्रणाली अंमलात आणण्याचा एक उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जात आहे .या नविन वेतन प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्यास स्वयंचलित प्रणालीद्वारे वेतनश्रेणीमध्ये वाढ होईल .या वेतनप्रणालीस ऑटोमॅटिक पे रिव्हिजन पद्धत असे म्हणतात .

कामगार युनियनकडुन सरकारला निवेदन –

कामगार युनियनकडुन केंद्र सरकारला कोरोना काळातील 18 महिन्याची डी.ए थकबाकी व आठवा वेतन आयोग / सातवा वेतन आयोगामध्ये सुधारणा करणेबाबत निवेदन सादर करण्यात आलेले आहेत .सरकारकाडुन सदर निवेदनावर सकारात्मक विचार झाल्यास ,70 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी