Spread the love

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ मंजुर करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.24.12.2006 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.24.12.2006 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांने सेवेत असताना सातत्याने केलेल्या अत्युत्कृष्ट कामाबाबत आगाऊ वेतनवाढ /वेतनवाढी राज्य शासनाच्या दि.26.06.1970 च्या परिपत्रकान्वये मंजुर करण्यात येतात .सदर शासन परिपत्रकामध्ये दि.11.02.1974 मध्ये विविध सुचना मार्गदर्शक तत्वे / सुधारणा सदर परिपत्रकामध्ये लागु करण्यात आले . आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्याचे अधिकार संबंधित विभाग / कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेले आहेत . सदर आगाऊ वेतनवाढी मंजुर करताना राज्य शासनाच्या शासन निर्णय 05.12.1979 व दिनांक 05.04.1983 मधील अटी व शर्तींचे पालन होणे आवश्यक राहील . या निर्णयामध्ये आगाऊ वेतनवाढी मंजुर करताना विविध निकष देण्यात आलेले आहेत .

आगाऊ वेतनवाढी मंजुरीसाठीचे विविध निकष –

आगाऊ वेतनवाढ मंजुर करताना शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांची सदर पदावर किमान तीन वर्षे नियमित सेवा झालेली असणे आवश्यक आहे .यासाठी कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल सोबत जोडणे आवश्यक राहील .वर्ग – ड मधील कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल लिहिण्याची पद्धत बंद करण्यात आलेली असल्याने त्यांच्या सेवा अभिलेखाच्या नोंदीच्या आधारे आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येईल .आगाऊ वेतनवाढी मंजुर करताना संवर्गनिहाय करण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत .तसेच आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यासाठी कमाल मर्यादेची अट घालण्यात आली आहे .सदरच्या निकषानुसार कर्मचाऱ्यांला पाच वर्षामध्ये एकदाच आगाऊ वेतनवाढ मंजुर करण्यात येईल .

तसेच पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्याला देखिल विविध अटी व शर्तींच्या अधीन राहुन आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्याची तरतुद दि.04.12.1979 व दि.24.09.1980 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे .शिवाय शासन सेवेत असताना उत्कृष्ट कामाबद्दल सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला देखिल अटींच्या अधिनस्त आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येईल .

याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.24.12.2006 रोजीचा सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 2008010915476001 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन आगाऊ वेतन वाढीचे निकष , अटी व शर्ती पाहु शकता .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी