Spread the love

आजच्या महागाईच्या युगामध्ये ,पैशांची योग्य व सुरक्षित गुंतवणुक करुन अत्यंत गरजेचे आहे . आजकाल जास्त रिटन्सच्या नावाने फसवणुक मोठ्या प्रमाणात होत आहेत .यामुळे सरकारी योजनेत आपले पैसे सुरक्षित व चांगले रिटर्न कसे मिळवायचे , सरकारचे कोणत्या गुंतवणुक योजना आहेत .ज्यामध्ये आपल्याला 12 टक्के ते 15 टक्के व्याजदर प्रतीवर्षी मिळेल व आपले गंतवलेले पैसे देखिल सुरक्षित राहतील .अशा कोणत्या सरकारीच्या पाच बेस्ट गुंतवणुक योजना आहेत ,ते पुढीलप्रमाणे पाहुयात

1.राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS )

राष्ट्रीय पेन्शन योजना ही केंद्र सरकारडुन राबविण्यात येते .ही योजना अगादेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीवेतन योजनेसाठी राबविण्यात येत होती .परंतु ही योजना आता देशातील सर्व असंघटीत कामगार ,व्यवसायिक ,तसेच निवृत्तीवेतनासाठी प्लॅन करणाऱ्या सर्वांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे .या योजनेमध्ये महिन्याला /वर्षाला गुंतवणुक करण्याची मुफा असते .गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर वर्षाला 12 टक्के ते 15 टक्के व्याजदराने हमखास रिटर्न मिळते .गुंतवणुक झालेली रक्कमेवर आपल्याला निवृत्तीनंतर म्हणजेच 60 वर्षानंतर किंवा गुंतवणुकीच्या 15 वर्षानंतर चांगली पेन्शन मिळवु शकता .ही योजना NSDL मार्फत राबविण्यात येते . सदर योजनेमध्ये प्रतिमहा योगदान दिल्यास , 5000/- ते 50,000/- रुपये महिना पेन्शन मिळु शकते .

2. राष्ट्रीय बचत पत्र ( NATIONAL SAVING CERTIFICATE )

राष्ट्रीय बचत पत्र ही एक केंद्र सरकारची योजना असुन , सदर योजनेमध्ये गंतवणुक केल्यास आपल्याला प्रमाणपत्र दिले जाते . सदर योजनेचा लाभ भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये घेता येतो . राष्टीय बचत पत्रामध्ये पाच वर्षांसाठी गुतवणुक करता येते .यामध्ये कमीत कमी 1000/- रुपये व त्यापुढे 100/- रुपयांच्या पटीत गंतवणुक करता येते . कमाल गुंतवणुकीच मर्यादा नसल्याने कितीही रक्कम या बचत पत्रामध्ये गंतवणुक करता येईल .या बचतीवर केंद्र सरकारकडुन व्याजदर निश्चित करण्यात येते .अगोदर या योजनेतील बचतीवर 12 टक्के व्याजदर होते . सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे व्याजदरामध्ये कपात होवून 7.90 टक्के व्याजदर करण्यात आले आहेत .तर सन 2020 ते 2022 या आर्थिक वर्षासाठी 6.80 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलेले आहेत .ही एक सुरक्षित व टॅक्स सेविंक बचत आहे .

3. LIC SIIP प्लान नंबर 852 –

LIC SIIP ( Systematic investment insurance plan ) – प्लान मध्ये सर्वात जास्त रिटन्स मिळते .यामधील गुंतवणुक शेअर मार्केटमध्ये केली जाते .परंतु या प्लानमधील गुंतवणुक अधिक जोखमीची नसल्याने , अधिक रिटन्समुळे LIC चा SIIP प्लान अधिक लोकप्रिय आहे .यामध्ये गुंतवणुक करण्याची कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल मर्यादा 65 वर्षे आहे .यामध्ये किमान 4000/- रुपये मासिक गुंतवणुक करणे आवश्यक असते .सदरची पॉलिसी 10 वर्षे ते 25 वर्षांकरीता घेवू शकतो .या पॉलिसीमधील गुंतवणुकीवर वार्षिक 10 टक्के ते 12 टक्के व्याजदर सहज मिळतो . यामुळे एलआयसीच्या या प्लान मध्ये सर्वाधिक लाभ + विमा देखिल कव्हर होते .यामुळे गुंतवणुकीवर जास्त लाभांश मिळवू इच्छिणाऱ्यांना LIC चा SIIP प्लान नंबर 852 हा एक उत्तम गुंतवणुक पर्याय आहे .

4. अटल पेन्शन योजना –

अटल पेन्शन योजना ही सुद्धा केंद्र सरकारची योजना असुन , या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला रिटन्स सहज मिळतो . कारण या योजनेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकारकडुन देखिल योगदान दिले जाते . यामुळे गुंतवणुकीचा हा एक उत्तम पर्याय आहे . आपल्याला किती पेन्शन हवी आहे ,यानुसार गुंतवणुकीचे प्लान आहेत .कमीत कमी 1000/- रुपये ते 5000/-रुपये मासिक पेन्शन 60 वर्षानंतर मिळते .या योजनेमध्ये गुंतवणुक योगदान खुपच कमी आहेत . यामुळे देशातील असंघटीत कामगार , गरिबांना ही योजना लाभदायी ठरणार आहे .वय वर्षे 18 असेल व मासिक पेन्शन 1000/- हवी असल्यास वार्षिक 42/- रुपये अत्यल्प योगदानाची रक्कम आहे . तर मासिक 5000/- पेन्शन हवी असल्यास , वार्षिक 210/-रुपये प्रिमियम रक्कम आहे .ही एक केंद्र सरकारची अनुदान प्राप्त योजना असल्याने ,या योजनेमध्ये मोठा आर्थिक फायदा होणार असल्याने , या योजनेमध्ये गुंतवणुक करणे खुप फायदेशिर ठरेल .

5. इतर सरकारी गुंतवणुक  –

केंद्र व राज्य सरकारच्या अनेक गुंतवणुक योजना आहेत , ज्यामध्ये चांगला आर्थिक फायदा होतो .जसे कि , गर्व्हनमेंट सेक्युरिटीज , बाँन्डस ,नॅशनल बाँन्डस , यामध्ये गुंतवणुक केल्यास वार्षिक 10 टक्के व्याजदर सहज मिळतो . त्याचबरोबर प्रधानमंत्री वय वंदना योजना , पीपीएफ तसेच सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक योजना आहेत . ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखिम नाही , व चांगला लाभ देखिल मिळतो .

अशा योजनेमध्ये गुंतवणुक करुन आपले पैसे योग्य ठिकाणी बचत करुन चांगले रिटर्न्स मिळवू शकता .फ्रॉड एजंटपासुन सावध रहा .सरकारी कार्यालयामध्ये जावूनच या योजनांचा लाभ घ्यावा .पैशांचा व्यवहार केल्यास पावती घणे विसरु नका .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी