Spread the love

• शेतकरी बंधू-भगिनींनो नमस्कार, शेतकरी बंधू भगिनींनो आपल्या सर्वांना माहीत आहेच की शेळीपालन व्यवसाय करून कमी भांडवलामध्ये आपण चांगला नफा मिळवू शकतो शेळीपालन व्यवसाय हा एक महत्त्वाचा व्यवसाय बनलेला आहे. शेळीपालन व्यवसाय हा कमी खर्चिक असल्यामुळे अनेक शेतकरी बंधू-भगिनी या व्यवसायाकडे वळत आहेत. तरीपण शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर थोडेफार भांडवल हे लागतेच, भांडवल म्हणजे शेळीपालनासाठी आलेले शेड म्हणा, शेळीपालनासाठी चांगल्या जातीची निवड आली, त्यांच्या चाऱ्याचे नियोजन, खाद्याचे नियोजन असं थोडाफार खर्च यासाठी करावा लागतो. या खर्चाकडे बघताच शेतकरी बंधू भगिनी हा व्यवसाय करण्याचे टाळत आहेत. अशा अडचणींवर मात करण्यासाठी एक पर्याय चांगला आहे आपल्यासाठी, तो पर्याय म्हणजे शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी आपण बँकेमधून लोन घेऊ शकतो आणि शेळीपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो. तर मित्रांनो आज पण हेच बघणार आहोत की शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन कशाप्रकारे काढावे व लोन काढण्यासाठी फाईल कशाप्रकारे तयार करावी जेणेकरून आपल्याला शंभर टक्के लोन हे भेटेल

• तर मित्रांनो, शेळी पालन करण्यासाठी लोन कशाप्रकारे घ्यावे व लोन साठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, कोणकोणते फॉर्म भरावे लागतात आणि शेळी पालन लोन साठी फाईल कशी तयार करावी याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज बघूया कृपया लेख शेवटपर्यंत वाचावा आपल्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत हा लेख पोहोचवावा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल

• शेतकरी बंधू भगिनींनो सरकार हे शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत आहे, म्हणजेच विविध योजनांच्या माध्यमातून व विविध लोन सिस्टीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी देत आहे, शेळी पालन व्यवसाय भारतामध्ये लोकप्रिय झालेला व्यवसाय आहे, आजपर्यंत शेळीपालन व्यवसायांमध्ये मटणाचे रेट अजिबात घसरले नाही. शेळीच्या दुधाची आणि बोकडाच्या मटणाची वाढती किंमत बघताच शेतकरी या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत आणि शेतकरी बंधू भगिनी शासनामार्फत आलेल्या योजनांचा किंवा विविध स्कीमचा लाभ घेऊन विविध व्यवसाय आता चांगल्या प्रकारे करत आहेत

• मित्रांनो आता शेळीपालन सुरू करण्यासाठी लोन फाईल कशी तयार करावी याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया

• एसबीआय बँकेकडून शेळीपालन सुरू करण्यासाठी आपल्याला भेटत आहे कर्ज, कशाप्रकारे कर्ज भेटते ते पाहूया या सोबतच कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात ते पण बघूया.

1) आपल्या जमिनीची नोंद केलेली कागदपत्रे

2) जो अर्ज करणार आहे त्याचे आधार कार्ड

3) जात प्रमाणपत्र – ST-SC/OBC

4) सहा महिने किंवा त्याच्याहून जुने बँक खाते

5) BPL काल हे उपलब्ध असल्यास लगेच जमा करावे

6) 4 पासपोर्ट साईज फोटो

7) शेळीपालन प्रकल्प अहवाल

8) निवासी लावा

मित्रांनो ही कागदपत्रे याची सत्यप्रत घेऊन बँक मधील लोन फाईल ला लावायचे आहेत, अधिकार्‍याकडे तपासून ती कागदपत्रे व फॉर्म जमा करायचा आहे, जमा केल्यानंतर बँकेतील प्रक्रिया द्वारे तुम्हाला लोन दिले जाईल, शेळीपालनासाठी तुम्ही लोन काढणार असाल तर त्याचा व्याजदर हा नऊ टक्के पर्यंत असू शकतो ते विविध बँकाच्या नियमांवरती असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी