Spread the love

सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी डी . ए बाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये भरमसाठ वाढ होणार आहे . सध्या केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो . यामध्ये आता मोठी वाढ होणार आहे . सदरची वाढ जुलै 2022 पासुन होणार असल्याने , डी. ए थकबाकीचा देखिल मोठा आर्थिक फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे .

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ( AICPI ) आधारे ठरविण्यात येतो . AICPI चे आकडे दि.31 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेले आहेत . या निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली असल्याने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये  5% वाढ होणे अपेक्षित आहे .केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर 2022 पासुन 4 टक्के डी.ए रोखीने अदा करणेबाबत जाहीर केले होते . परंतु AICPI चे आकड्यांचा विचार केला असता , सरकारी / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांचा माहे जुलै पासुन 5 टक्के डी.ए वाढ होणे अपेक्षित आहे .AICPI चे आकडे माहे जुलै 2022 पर्यंत जाहीर करण्यात आलेले आहेत . माहे जुन मध्ये AICPI चे निर्देशांकांचा आकडा 129.2 आहे तर , यामध्ये वाढ होवुन माहे जुलै मध्ये AICPI आकडा 129.9 वर जावून पोहोचला आहे .

AICPI च्या आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4.57 टक्के म्हणजेच 5 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे . सदरचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे .AICPI चे निर्देशांकांची आकडेवारी अहवाल पुढीलप्रमाणे पाहता येईल .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी