Spread the love

जेष्ठ नागरिक बचत योजना SCSS ( Senior Citizen saving scheme ) केंद्र सरकारच्या पोस्टामार्फत राबविण्यात येते .या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आपल्यासाठी योग्य गुंतवणुक व जोखिम नसणारी पण अधिक व्याजाची रक्कम उपलब्ध व्हावी .जेणेकरुन वृद्धापकाळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधेसाठी मोठी आर्थिक लाभ होईल .या योजनेची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .

या योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजने अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास सर्वात जास्त म्हणजेच 7.40 टक्के व्याजदर मिळतो .ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक बचत योजना असुन , या बचत योजना अंतर्गत कमीत कमी 1000/- रुपये तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये रक्कम गंतवणूक करता येते . या बचत खात्यामध्ये आपल्या पैशंची कोणत्याही प्रकारची जोखिम नसल्याने या ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त फायदेशिर योजना आहे .या योजने अंतर्गत गुंतवणुक केलेली रक्कम पाच वर्षांसाठी लॉक करण्यात येते .तर खातेखारकांच्या गरजेनुसार व्याजाची रक्कम प्राप्त करु शकतात . जसे कि महिन्याला व्याज प्राप्त करणे ( monthly intrest amount paid system ) तसेच तिमाही व्याज ( quarterly intrest paid system ) प्राप्त करु शकतात किंवा वर्षातुन दोनदा किंवा वर्षाला व्याजाचा रक्कम प्राप्त करु शकतील .

पात्रता –

या बचत योजने अंतर्गत भारतातील नागरिकत्व असणारे 60 वर्षापेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील . त्याचबरोबर भारतीय संरक्षण दलामधील सेवानिवृत्त 50 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या तर 60 वर्षांपेक्षा कमी वय असणारे निवृत्त संरक्षण कर्मचारी ,तसेच जे नागरिक स्वेच्छिक 55-60 वयोगटातील सेवानिवृत्तीच्या निवड केली आहे .

महिना 9250/- व्याज मिळेल या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांने 15 लाख रुपये गंतवणुक केली असता , त्यास 7.40 टक्के व्याजदर मिळेल .या व्याजदरानुसार व्याजाच्या रक्कमेची गणना केली असता , सदर बचत योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकास व्याजाची रक्कम प्रतिमहा 9250 /- रुपये तर तिमाही 27,750/- रुपये तर वर्षातुन दोनदा व्याज घेतल्यास 55,504 रुपये मिळेल तर वर्षातुन एकवेळेसच व्याजाची रक्कम घेतल्यास सदर ज्येष्ठ नागरिकास वार्षिक 1,11,008/- रुपये व्याजाची रक्कम मिळेल

One thought on “SCSS : घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावे पोस्टामध्ये या योजने अंतर्गत एकदाच पैसे गुंतणुक करुन दरमहा 9250/-रुपये मिळवा .”

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी