Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सेवाविषयक महत्वाचे शासन निर्णय / परिपत्रके तसेच असधिसुचना यांचे संकलित पुस्तिका राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन निर्गमित करण्यात आलेली असुन सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्यामार्फत पुस्तिका प्रदर्शित करण्यात आलेली आहेत . जेणेकरुन राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवाविषयक वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय / परिपत्रके / अधिसुचना यांविषयी माहीती व्हावी या उद्देशाने सेवाविषयक महत्वपुर्ण शासन निर्णय , परिपत्रक व अधिसुचनांचे संकलन करण्यात आले आहेत .

या संकलन पुस्तिकामध्ये , कर्मचाऱ्यांच्या मूळ नियुक्तीसाठी अर्हताप्राप्त नसलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत शासन निर्णय व सुधारित शासन परिपत्रक नमुद करण्यात आलेले आहेत .तसेच शासन सेवेत प्रवेशासाठी विविध विद्यापीठे / स्वायत्त संस्था इ.पदव्या ग्राह्य धरणेबाबत विविध वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेले शासन निर्णय यामध्ये नमुद आहेत .त्याचबरोबर तज्ञ कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिनांकानंतर करार पद्धतीने नियुक्ती किंवा शासन सेवेत पुनर्नियुक्ती / शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेत मुतदवाढ देणेबाबत वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेले शासन निर्णय यामध्ये नमुद आहेत .तसेच सेवा प्रवेश नियम संविधानाच्या 309 खाली अधिसुचित करताना करावयाची कार्यवाही व सेवा भरतीचे प्रमाण विहीत करणेबाबत त्याचबरोबर पदोन्नतीसाठी निम्न संवर्गात किमान सेवेच्या अनुभवाची अट याबाबतचे सविस्तर स्पष्टीकरणे देणेसंदर्भात निर्णय नमुद करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर शासन सेवाप्रवेशाची कमाल वयोमर्यादा , संगणक हाताळणी प्रमाणपत्र , मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 व भाग 16 सामान्य प्रशासन विभागाने अधिसुचित केलेले विविध पदांचे सेवाप्रवेश नियम अधोरेखित करण्यात आलेले आहेत .तसेच गोपनिय अहवाल मत्ता व दायित्वे ,निवडसुची ,निवडसुची ,आस्थापने सुधारित कार्यपद्धती मानिव दिनांक ,आगाऊ वेतनवाढ ,विभागिय चौकशी या संबंधातील सर्व शासन निर्णय ,परिपत्रके व अधिसुचना या संकलानामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच राज्य शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित झालेले सर्व शासन निर्णय , परिपत्रके व अधिसुचना या संकलन पुस्तिकामध्ये नमुद करण्यात आलेले असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना विविध निर्णय पाहण्यासाठी अधिक सोपे झाले आहे .या संदर्भातील संकलन पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

संकलित पुस्तिका

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी