Spread the love

शेतकऱ्यांसाठी सरकारकडुन अनेक योजना राबविण्यात येते , यामधील शेतकऱ्यांच्या हिताची व अत्यंत महत्वुपर्ण योजना म्हणजे शेतकरी बांधवांना शेतजमिन खरेदी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत शेतजमिनीच्या किंमतीपैकी 85% रक्कम बिनव्याजी कर्ज सरुपात दिले जाते . यामुळे शेतकऱ्याला शेती खरेदी करण्यासाठी अधिक आर्थिक पाठबळ मिळते . व शेतीसाठी आवश्यक पैसे साठी सावकारांकडे हात पसरविण्याची आवश्यकता नाही . या याजनेसाठी कोणत्या अटी / शर्ती आहेत . याविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

या योजनेचा लाभ फक्त हेच शेतकरी घेवू शकतील .

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे असंचित अशी पाच एकर पेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर सिचित जमिन अडीच एकर पेक्षा कमी असणे आवश्यक आहे .त्याचबरोर जे शेतकरी भुमिहीन आहेत असे शेतमजुर असणारे या योजने अंतर्गत कर्ज प्राप्त करु शकतात . शेतकऱ्यांच्या नावावर इतर कोणतेही कर्ज चालु असल्यास किंवा थकित कर्ज असल्यास असे शेतकरी या योजना अंतर्गत कर्ज प्राप्त करु शकत नाहीत .त्याचबरोबर शेतकऱ्यांची दोन वर्षाचे कर्जफेडाची नोंदणी असणे आवश्यक असणार आहे .

कर्ज किती मिळणार  ?

या योजना अंतर्गत शेतकऱ्याला शेतजमिनीच्या एकुण किंमतीच्या 85 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरुपात प्राप्त होते .उर्वरित रक्कम म्हणजेच 15 टक्के रक्कम शेतकऱ्याला भरावी लागते .सदर रक्कमेची परतफेड पुढील 10 वर्षांमध्ये करायची असते . जर शेतकरी सदर रक्कम परतफेड करणे ( हप्ते भरणा ) थांबविल्यास सदर जमिनीवर बॅकेचा ताबा येवून जातो .

नेमकी योजनेचे स्वरूप काय आहे .

या योजने अंतर्गत स्टेट बँक आपल्याला बिनव्याजी 85% रक्कम देते . परंतु जमिन खरेदी ही बँकेच्या नावाने होते . म्हणजेच ज्या वेळी शेतकरी 85% कर्जाची परतफेड करतो त्यावेळी सदर शेतजमिन शेतकऱ्याच्या नावावर होते .यामुळे शेतकऱ्यास कर्जाची पुर्ण परतफेड करावी लागते . दिलेल्या कालावधी आधीच कर्जाची परतफेड केल्यास सरकारकडुन अनुदानाची देखिल तरतुद आहे .

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखेस भेट द्यावी .शेतकऱ्यांसाठी शेतजमिन खरेदी करण्यासाठी ही एक फायदेशिर योजना आहे .या योजने अंतर्गत बिनव्याजी कर्ज घेवून शेतजमिन खरेदी शकता .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी