Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या राजकाराणामध्ये आणखीण एक मोठी घडामोड घडणार आहे . ती म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे मनसे पक्षात लवकरच विलिनीकरण होण्याची दाट शक्यता आहे . मुळ शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यावर एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे यांच्याकडुन नेहमीच मुळ शिवसेना आमचीच अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे . शिंदे गटामध्ये आमदारांची संख्या मोठी असल्याने , शिंदे गट हाच मुळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडुन करण्यात आला आहे . परंतु या दावामुळे उद्धव ठाकरेंकडुन सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे .

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप सुनावणी दिलेली नाही . जर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजुंने निकाल दिल्यास शिंदे गटाला इतर कोणत्या तरी पक्षात सामाल व्हावे लागणार आहे . यासाठी एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जास्त जवळीकता साधत आहेत . या वर्षीचा दसरा मेळावा देखिल राज ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र घेणार असल्याची वृत्त समोर आली आहे . यामुळे शिंदे गट मनसे पक्षामध्ये सामील होण्याची जास्त शक्यता आहे . शिवाय शिवसेना मधील अनेक पदाधिकारी राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पक्षात असताना एकत्र काम केलेले आहेत . यांच्यामुळे शिंदे गटामधील बऱ्याच आमदारांनी , मनसे पक्षात विलिनीकरणाची इच्छा दर्शविली आहे .

सर्वोच्च न्यायालयाने जर शिंदे गटांच्या बाजुने निकाल दिल्यास , उद्धव ठाकरेंना निवडणुक चिन्हाला मुकावे लागेल . तर उद्धव ठाकरेंच्या बाजुने निकाल लागल्यास , शिंदे गटाला इतर कोणत्यातरी पक्षामध्ये सामील व्हावे लागणार हे नक्की आहे . यामुळे एकनाथ शिंदे गट भाजपा पक्षात जाण्यापेक्षा मनसे पक्षात विलिन होणे जास्त पसंत करतील .याबाबत पत्रकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता , त्यांनी विलीनीकरण सहमत असल्याची माहिती दिली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी