Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय ,अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे डी.ए वाढ राज्य सरकारकडुन निश्चित करण्यात येणार आहे .कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये डी.ए वाढ केंद्र सरकारच्य धर्तीवर वाढ निश्चित करण्यात येते .परंतु डी.ए वाढ केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सदर डी.ए लागु होणार खुप विलंब होतो .

यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होतो .शिवाय कर्मचाऱ्यांकडुन आंदोलन ,संप किंवा वारंवार निवेदन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ करण्यात येते .परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत . यामध्ये कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन डी.ए वाढ ,फरकासह लागु करणेबाबतचा निर्णय तात्काळ घेवून कार्यवाही करण्यात आली . केंद्र सरकारने जुलै 2022 पासुन 38 टक्के डी.ए वाढ सप्टेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने देण्याचे जाहीर केले असले तरी , केंद्रीय कामगार युनियन कडुन डी.ए 39 टक्के करण्याची मागणी होत आहे . म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतन देयकासोबत डी.ए वाढ निश्चित करण्यात आलेली आहे .

याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना विनाविलंब डी.ए वाढ राज्य शासनाकडुन निश्चित करण्यात येणार आहे .राज्य कर्मचाऱ्यांना जोनवारी डी.ए वाढ ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत लागु करण्यात आलेली असुन जुलै 2022 ची डी.ए वाढ केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सदरची वाढ राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येणार आहे .कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डी.ए वाढ निश्चित करण्यात आलेली आहे . परंतु AICPI चे जुलै महिन्यापर्यतचे आकडे जाहीर झाले असल्याने ,सदर आकडेवारीनुसार डी.ए मध्ये 39 टक्के वाढ करण्याची मागणी कामगार युनियन कडुन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी