Spread the love

राज्य शासन सेवेतील वर्ग – 3 संवर्गातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे , वर्ग – 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे . अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देखिल सेवेत मुदतवाढ / सेवेत करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणेबाबतची तरतुद करण्यात आलेली आहे . या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडुन सुधारित शासन निर्णय दि.08 जानेवारी 2016 रोजी निर्गमित करण्यात आला आहे . या संदर्भातील दि.08.01.2016 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासन सेवेत अधिकारी कर्मचारी यांना पुनर्नियुक्ती , मुदतवाढ , तसेच नियमित पदांवर करार पद्धतीने नियुक्ती देणेबाबतची तरतुद सामान्य प्रशासन विभागाच्या दि.09.11.1995 च्या निर्णयानुसार करण्यात आलेली आहे .अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेत मुदतवाढ , पुनर्नियुक्ती या संदर्भात उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.85/2008 मध्ये दिलेले आदेश विचारात घेवून विहीत अटी व शर्तींचे काटेकोर पालन करणाऱ्याच अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच सेवेत मुदतवाढ / पुनर्नियुक्ती देण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत .सदरच्या नमुद निर्णयानुसार सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांची करार पद्धतीने करण्यात येणारी नियुक्ती ही नियमित स्वरुपाच्या कामकाजासाठी न करता करता केवळ विवक्षित कामासाठीच करण्यात येईल .

शिवाय अशा स्वरुपाच्या विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता / संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव ही पुर्वअट ठेवण्यात आलेली आहे .सेवेत करार पद्धतीने पुनर्नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन ठरविताना त्यांना सेवानिवृत्तीपुर्वी मिळत असलेले वेतनातुन ( मुळ वेतन + महागाई भत्ता धरुन ) त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळत असलेली निवत्तीवेतन वजा करण्यात यावी . येणारी रक्कम ही त्यांना पारिश्रमिक म्हणुन निश्चित करण्यात येते .सदर पारिश्रमिक रक्कम 40,000/- पेक्षा अधिक असू नये .

करार पद्धतीने नियुक्ती देताना सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची शारिरीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक राहील शिवाय सदर कर्मचाऱ्यांचे  वय 70 वर्षांपेक्षा अधिक असू नये .याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.08.01.2016 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक -201601071217149007 ) पुढील लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करु शकता .

शासन निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.

मराठी बातमी